लोकदिशा मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

तुमच्या वेबसाइटवर आजचे बाजारभाव लावा

FPO, शेतकरी उत्पादक कंपनी, बाजार समिती, कृषी संस्था किंवा मराठी ब्लॉगसाठी मोफत. जिल्हा किंवा शेतमाल निवडा, खालचा कोड कॉपी करून तुमच्या पानावर लावा. दर दिवसातून दोनदा आपोआप अद्ययावत होतात; तुम्हाला काहीच करावे लागत नाही.

नमुना

हा कोड कॉपी करा

WordPress मध्ये: पानात "Custom HTML" ब्लॉक घाला आणि कोड चिकटवा. Blogger मध्ये: Layout → Add a Gadget → HTML/JavaScript.

नेहमीचे प्रश्न

शुल्क आहे का? नाही, पूर्णपणे मोफत.

दर कुठून येतात? केंद्र शासनाच्या Agmarknet वरून (data.gov.in, Government Open Data License – India). बॉक्समध्ये स्रोत दिलेला असतो.

बॉक्समधून तुमच्या वाचकांची माहिती गोळा होते का? नाही. बॉक्समध्ये कुकी, जाहिरात किंवा ट्रॅकिंग नाही.

दुसरा आकार किंवा रंग हवा? आम्हाला कळवा.